ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थीनी मायरा मुतगीने एकल नृत्यामध्ये पटकावला प्रथम क्रमांक

665 0

पुणे १२ फेब्रुवारी: अनास इंडिया द्वारे आयोजित अखिल भारतीय १६ व्या राष्ट्रीय सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत नृत्य दर्पण या नृत्य प्रकारात ध्रुव ग्लोबल स्कूलची पाचवी ची विद्यार्थीनी मायरा मुतागीने प्रथम क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्रिन्सिपल संगीता राउतजी यांनी भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात.
मायराच्या पायातील घंगरुचा आवाज आणि चेहर्‍यावरील सुंदर स्मित हास्याने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. नृत्यांगणा मायराचे घुंगरू आणि स्मित हास्य दोन्ही एकाच सुरात डोलत होते. ती आपल्या नृत्यातून सुंदर झंकार निर्माण करीत होती. सूर, लय, वेग, मुद्रा प्रत्येक अभिव्यक्तीमध्ये तीची एक लय होती. उत्कृष्ट सादरीकरणाबरोबरच तीचे नृत्य एक अदभूत संयोजन आणि अभिव्यक्ती असून याच जोरावर तीने प्रथम क्रमांक पटकाविला. मायरा मुतागीने भारतीय शास्त्रीय ओडिसी नृत्य प्रकारातील कनिष्ठ वयोगटातील एकल नृत्यात भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. तसेच तिला सत्रातील सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणूनही गौरविण्यात आले.
तीने शुभश्री राऊतराय यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याची तयारी केली होती.

Share This News
error: Content is protected !!