SPPU ONLINE EDUCATION: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण पद्धतीच्या व्यवस्थापन (मॅनेजमेंट) अभ्यासक्रमांना या शैक्षणिक (SPPU ONLINE EDUCATION) वर्षात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ऑनलाइन एमबीए (MBA) अभ्यासक्रमासाठी एकूण ३३३ विद्यार्थ्यांनी, तर दूरस्थ शिक्षण पद्धतीच्या अभ्यासक्रमासाठी २३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या आकडेवारीवरून लवचिक उच्च शिक्षण पर्यायांची वाढती स्वीकृती दिसून येते. या अभ्यासक्रमांवर देखरेख करणाऱ्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राने (CDOE) या शैक्षणिक वर्षापासून प्रथमच ऑनलाइन एमसीए (MCA) अभ्यासक्रम सुरू केला आहे. या नवीन अभ्यासक्रमाला पहिल्याच वर्षी ६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये, CDOE ने चालू सत्रासाठी एकूण २,६७६ प्रवेशांची नोंद केली आहे.
या ट्रेंडबद्दल बोलताना CDOE चे संचालक डॉ. वैभव जाधव म्हणाले, “आमच्या अभ्यासक्रमांमुळे कार्यरत व्यावसायिक, उद्योजक, गृहिणी आणि पूर्णवेळ विद्यार्थी अशा विविध स्तरांतील (SPPU ONLINE EDUCATION) शिकणाऱ्यांना आकर्षित केले आहे. पुणे विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमांची परवडणारी शुल्क रचना आणि सत्रानुसार शुल्क भरण्याची सोय यामुळे उच्च शिक्षण अधिक सुलभ झाले आहे.”
Tamhini Ghat Accident :’सनरूफ’ ठरला जीवघेणा ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, महिलेचा जागीच मृत्यू!
नव्याने सुरू झालेल्या एमसीए अभ्यासक्रमाला मिळालेला प्रतिसाद, अंतिम मंजुरी मिळण्यास झालेल्या विलंबामुळे थोडा कमी राहिला, असेही डॉ. जाधव यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की, (SPPU ONLINE EDUCATION) पुढील वर्षी वेळेवर परवानग्या आणि अधिक चांगल्या जनजागृती मोहिमांमुळे या अभ्यासक्रमांमध्ये अधिक विद्यार्थी सामील होतील.” विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, CDOE चा उद्देश डिजिटल शिक्षण सुविधांचा विस्तार करणे आहे. यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रतिष्ठेच्या आधारावर, देशभरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि परवडणारे शिक्षण उपलब्ध होणार आहे.