पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथे मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट मतदान झाले. सर्व केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया अतिशय उत्साह परंतु शांतापूर्ण आणि शिस्तीच्या वातावरणात पार पडली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आधिसभेवर पदवीधर मतदारांमधून एकूण दहा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. १ जून पासून सुरू झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत विद्यापीठाचे दोनशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी काम करत होते.
अतिशय कडेकोट बंदोबस्तात व नियोजनबध्द पद्धतीने ही प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाकडून पार पडली. रविवारी सकाळपासूनच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील केंद्रासह सर्वच केंद्रांवर मोठा उत्साह होता. दुपारच्या वेळातही अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी मतदानासाठी येत होते. संध्याकाळी पुन्हा हा ओघ थोडा वाढत अखेर पाच वाजता केंद्रांवर शांततापूर्ण वातावरण पार पडले.
मुख्य म्हणजे तरुण विद्यार्थ्यांसह, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांनीही या मतदानाला हजेरी लावली होती.
मतदान टक्केवारी
पुणे
पुरुष ७५२८
महिला ३७००
एकूण ११२२८
टक्केवारी २४.८५अहमदनगर
पुरुष ४८९६
महिला १६८७
एकूण ६५८३
टक्केवारी २४.३नाशिक
पुरुष ४१७६
महिला १८७६
एकूण ६०४९
टक्केवारी ३७.१४सिल्वासा
पुरुष १
महिला ५
एकूण ६
टक्केवारी ४२.८६एकूण
पुरुष १६६०१
महिला ७२६५
एकूण २३८६६
टक्केवारी २६.८५