RAISONI COLLAGE: रायसोनी कॉलेज पुणेच्या विद्यार्थ्यांनी ऑटोनॉमस इलेक्ट्रिक व्हेईकल डिझाइन (ए-बाहा) स्पर्धेत अखिल भारतीय स्तरावर पटकावला चौथा क्रमांक

69 0

पुणे: जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे, विद्यार्थ्यांच्या संघाने सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (SAE) इंटरनॅशनलने आयोजित केलेल्या ऑटोनॉमस इलेक्ट्रिक व्हेईकल डिझाइन स्पर्धेत प्रथमच अखिल भारतीय स्तरावर चौथा क्रमांक पटकावला. नुकतीच ही स्पर्धा चेन्नईतील जीएआरसी येथे पार पडली.

रायसोनी कॉलेज पुणेच्या विद्यार्थ्यांच्या संघाने तांत्रिक कौशल्य, टीमवर्क आणि नाविन्यपूर्णतेचे प्रदर्शन करत या स्पर्धेत तीन वेगवेगळ्या प्रकारात पुरस्कार मिळवले. रायसोनी कॉलेज पुणे संघाने ए-बाहा (A-BAJA 2025) मध्ये उल्लेखनीय यश मिळवत 15 हजाराचे रोख बक्षीस आणि ट्रॉफीसह अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल (ACC) स्पर्धा जिंकली. उत्कृष्ट मार्गदर्शन आणि मार्गदर्शनासाठी द्रोणाचार्य हा सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कार जिंकला. तसेच ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (AEB) डायनॅमिक स्पर्धेत उपविजेते पद मिळवले. तसेच देशभरातील असंख्य सहभागी संघांमध्ये प्रभाव पाडत एकूण अखिल भारतीय स्तरावर चौथी रँकिंग मिळवली. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पासाठी डॉ. आशा शेंडगे आणि प्रा. आरती पटले यांनी मार्गदर्शन केले.

ऑटोनॉमस व्हेईकल इंजिनिअरिंगमधील संघाच्या उत्कृष्टतेची दखल घेत हे पुरस्कार अवजड मेटेरियल मंत्रालयाचे डॉ. हनीफ कुरेशी आणि जीएआरसीचे संचालक डॉ. ए. एस. रामाधस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

रायसोनी कॉलेज पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये प्रगत तांत्रिक कौशल्य, व्यावहारिक शिक्षण आणि स्पर्धात्मक भावना वाढवण्यासाठी कार्य करत असल्याचे सांगितले.

रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी, रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्री. श्रेयश रायसोनी, कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर आणि रायसोनी कॉलेज पुणेचे प्रभारी डायरेक्टर डॉ. एन. बी. हुले यांनी सर्व विजेत्यांचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

Share This News
error: Content is protected !!