मुंबई : चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Job) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशनसुद्धा जारी करण्यात आले आहे. या नोटिफिकेशनमध्ये पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
एमपीएससी अंतर्गत विविध पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत असिस्टंट प्रोफेसर, मेडिकल एज्युकेश अॅण्ड रिसर्च ग्रुप एची पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
कुठे होणार भरती?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच नव्याने स्थापन झालेली महाविद्यालये,धाराशिव, नंदुरबार, परभणी आणि सातारा आणि सिंधुदुर्ग येथे ही भरती केली जाणार आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे.
किती असणार फी?
खुल्या गटातील उमेदवारांकडून 719 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. तर मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग उमेदवारांकडून 449 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Mumbai Indians : ‘या’ कारणांमुळे ‘मुंबई इंडियन्स’ची धुरा रोहितऐवजी पंड्याकडे देण्याचा निर्णय घेतला
Pune News : पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात बॅनरबाजी; कष्टाळू कार्यकर्ता कोण?
Chandrapur News : चंद्रपुर हळहळलं ! महिलेनं लेकीला विहिरीत ढकललं अन्…
Pune News : पुण्यात नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा