एकाच दिवशी दोन परीक्षा असल्यानं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन पुण्यात 48 तास सुरू आहे.
या आंदोलनाला यश आलं असून एमपीएससची 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. एमपीएससी आणि आबीपीएस या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत्या.
पुण्यातील नवी पेठेत असलेल्या शास्त्री रोडवर MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
25 ऑगस्टला घेण्यात येणारी MPSC ची परिक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आमदार रोहित पवारदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.