MIT STARTUP स्टार्टअप्स मुळे युवा स्वप्नांना मिळेल बळ; एमआयटी टीबीआयचे संचालक प्रा.प्रकाश जोशी यांची माहिती

348 0

MIT STARTUP “एक अशी कल्पना जी आयुष्य बदलू शकते, अशाच काहीशा तरुणांच्या नवीन विचारसरणींच्या पंखांना बळ देण्यासाठी सुरू केलेल्या एका स्टार्टअप ने सामान्य माणसाच्या जीवनात प्रकाश आणता येतो. नव उद्योजकांनी समाजातील समस्यांना ओळखून त्यावर स्टार्टअप सुरू करणे ही काळाची गरज आहे.” अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयू टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेटर (एमआयटी-टीबीआय) चे संचालक प्रा. प्रकाश जोशी आणि सीईओ निनाद पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.MIT STARTUP

MIT STARTUP स्टार्टअप्स मुळे युवा स्वप्नांना मिळेल बळ; एमआयटी टीबीआयचे संचालक प्रा.प्रकाश जोशी यांची माहिती

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी तयार करावी. या उद्देशाने पुण्याच्या कोथरूड परिसरातील एमआयटी-डब्ल्यूपीयू कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेल्या एमआयटी टीबीआयच्या कार्याच्या चढत्या आलेखाची माहिती देण्यात आली. यावेळी प्रा. जोशी म्हणाले भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग डीएसटी द्वारे समर्थित हे टीबीआय अधिकृत नवोन्मेष आणि उद्योजकता केंद्र आहे. या सेंटर द्वारे सुरूवातीच्या टप्प्यातील उद्योजकांना-विद्यार्थी आणि अनुभवी संस्थापकांसह- निधी, मार्गदर्शन, ऑफिस स्पेस आणि नेटवर्किंग सारखे आवश्यक समर्थन देऊन मदत केली जाते. राष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञान व्यवसाय इनक्यूबेटर म्हणून ओळखले जाणारे डीएसटी आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या सक्रिय पाठिंब्याने कार्यरत आहे.

MIT WPS KIRTAN PARISHAD: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ तर्फे श्री क्षेत्र आळंदीत श्री क्षेत्र आळंदीत ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’ चे आयोजन

स्टार्टअप्सचा विचार करता सध्या देशात १० टक्के सक्सेस रेश्यो आहे. यामुळे नवोद्यजकांनी जिद्द आणि महत्वकांक्षा ठेवणे गरजेचे आहे. तसेच सर्वप्रथम मार्केटिंगवर अधिक भर दया, त्यानंतर फायनान्सवर भर दयावा. येथील केंद्राच्या माध्यमातून शहरातील सर्व स्टार्टअप्स सुरू करण्यांसाठी आम्ही योग्य फंडिंग देऊन परिपूर्ण ती मदत करण्यास वचनबद्ध आहोत.

डब्ल्यूपीयूच्या कॅम्पसमध्ये ११ हजार चौरस फूट समर्पित जागा आहे. या मध्ये को वर्किंग ऑफिस आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्ससाठी डिझाइन केलेली जलद प्रोटोटाइपिंग लॅब समाविष्ट असल्याची माहिती निनाद पाटील यांनी दिली.

येथील टीबीआयने आज पर्यंत ७५ स्टार्टअप्सना समर्थन दिले आहे. ज्या मध्ये ३६ सध्या इनक्यूबेटेड आहेत आणि २० स्टार्टअप्सना विविध कार्यक्रमांतर्गत निधी देण्यात आला आहे. इनक्येबेटरमध्ये डेमो डे, स्टर्टअप शोकेस आणि इनोव्हेशन स्पर्धा आयोजित केल्या जातात ज्यामुळे तरूण नवोन्मेषकांना उभारण्यासाठी एक व्यासपीठ मिळते. हे भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम अंतर्गत निवडक स्टार्टअप्सना सक्रियपणे अनुदान आणि सीड फंडिंग देखील देत आहे.

एमआयटी टीबीआय केवळ यशस्वीच नाही तर समाजिकदृष्टया प्रभावी आणि शाश्वत व्यवसाय निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. हे भारतीय स्टार्टअप्सच्याा पुढील पिढीला आकार देण्यास मदत करत आहे.

निनाद पाटील यांनी सांगितले की, येथील तांत्रिक आणि विपणन टीम आज विविध महाविद्यालयांना भेट देत आहे आणि तरूणांना उद्योगांसाठी प्रेरित करत आहेत. यामुळे स्टार्टअपसाठी अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना उदयास येत आहेत. तसेच येथील कर्मचारी अतिशय वैयक्तिक आणि सहानुभूतीपूर्ण मार्गदर्शन देऊन, अधिकृत सेवांच्या पलीकडे नवोन्मेषक स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यास सक्षम आहेत. तरुण उद्योजक स्वतःच्या स्टार्टअपसाठी  कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी एमआयटी टीबीआयशी संपर्क साधू शकता.

Share This News
error: Content is protected !!