Breaking News
SSC-HSC Exam

HSC Board Exam 2024 : उद्यापासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात; शिक्षण मंडळाने आणला ‘हा’ नवीन नियम

509 0

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (HSC Board Exam 2024) इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. ही परीक्षा बुधवार, दिनांक 21 फेब्रुवारी 2024 ते मंगळवार, दिनांक 19 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 8,21,450 विद्यार्थी व 6,92,424 विद्यार्थीनी आहेत. एकूण 10497 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3320 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेसाठी देखील परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे अधिकची वेळ वाढवून देण्यात आलेली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मराठा आरक्षण विधानसभेत एकमताने मंजूर

Ajit Pawar : वादा तोच पण, दादा नवा…! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झळकलेल्या ‘त्या’ बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा

Maratha Reservation : आधी ‘ती’ मागणी मान्य करा अन् नंतरच..; अधिवेशनापूर्वी जरांगे पाटलांची आक्रमक भूमिका

Share This News
error: Content is protected !!