यूपीएससीच्या निकालात मुलींचा डंका; श्रुती शर्मा भारतातून पहिली

294 0

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या तीनही क्रमांकावर मुली आहे.

श्रुती शर्मा ही देशात पहिली आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर अंकिता अग्रवाल, तिसऱ्या क्रमांकावर गामिनी सिंगला, तर चौथ्या क्रमांकावर ऐश्वर्या वर्मा ही आहे. टॉप फाईवमध्ये उत्कर्ष द्विवेदी हा एकच मुलगा आहे. देशभरातील एकूण ७४९ उमेदवार Upsc च्या या निकालात यशस्वी ठरले आहेत.

UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी घेण्यात आली. त्यातून निवडलेल्या उमेदवारांची वैयक्तिक चाचणी 5 एप्रिल ते 25 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली. UPSCने 4 मार्च 2021 रोजी अधिसूचना जारी करून सीएसीइ 2021 साठी सुरु केली होती.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 होती. त्यांनतर प्राथमिक परीक्षा 27 जून 2021 रोजी घेण्यात आली. ज्याचा निकाल 29 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला. त्यांनतर मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली आणि 17 मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला. उमेदवार रोल नंबर सर्च करून आपला निकाल तपासू शकतात. अधिकृत संकेतस्थळाला http://upsc.gov.in भेट देऊन शोधू शकतात. यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेला बसणारे उमेदवार पीडीएफ मध्ये आपलं नाव किंवा आपला नोंदणी क्रमांक शोधू शकतात.

 

 

Share This News
error: Content is protected !!