Maratha Reservation Suicide

Maratha Reservation : “मी गेलो तरी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे”; म्हणत तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

474 0

धाराशिव : जालन्यात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) व कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू केले असून यामुळे राज्यातील संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात समिती स्थापन केली असून निजामकालीन नोंदी तपासून कुणबी प्रमाणपत्रे देण्याची घोषणा केली आहे.

यादरम्यान धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे ही घटना घडली आहे. तरुणाने आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणा देत गावातील तलावात उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. किसन चंद्रकांत माने (30 असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

काय घडले नेमके?
किसन माने मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे असे म्हणत होता. बुधवारी दुपारच्या सुमारासही तो याच विषयावर बोलत होता. एका दुकानासमोर बसून आरक्षणावर चर्चा सुरू असताना किसन याने अंगावरील कपडे काढून मी गेलो तरी तुम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे ओरडत गाव तलावाकडे धाव घेतली. क्षणार्धात त्याने पाण्यात उडी टाकली. त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाळात फसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलीस प्रशासन गावात दाखल झाले. त्यांच्यासमोरच गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

Share This News

Related Post

Accident News

Accident News : मंत्र्याच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; 5 पोलीस जखमी

Posted by - November 25, 2023 0
बिहार : बिहारच्या ओबरातील तेजपुरा या ठिकाणी मंत्र्याच्या ताफ्यातील गाडीचा अपघात (Accident News) झाला आहे. या अपघतात मंत्री श्रवण कुमार…
Nashik News

Nashik News : घोटी-सिन्नर महामार्गावर कार आणि बाईकचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 8, 2024 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातून अपघाताची (Nashik News) एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये बाईक आणि स्विफ्ट कारमध्ये धडक झाल्याने…

राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर वसंत मोरे काय म्हणाले ?

Posted by - April 11, 2022 0
मुंबई- पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज मुंबईत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नेमके काय घडले…
Nashik Crime News

Nashik Crime News : नाशिक हादरलं ! मांत्रिक महिलेची भक्तानेच केली हत्या

Posted by - July 8, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मांत्रिक महिलेची तिच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या भक्तानेच चाकूने…

राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा हिंदुंनाच, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Posted by - May 4, 2022 0
मुंबई – जो पर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *