YERWADA POLICE STATION: पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत, पुणेकर स्वतःच्या घरातही सुरक्षित नाहीत, असं म्हणण्यासारख्या अनेक घटना गेल्या (YERWADA POLICE STATION) काही दिवसात घडल्या आहेत. आणि त्यातच आणखी एक भयंकर घटना येरवडा परिसरात घडली. चार तरुणांनी थेट घरात घुसून एका महिलेवर आणि तिच्या मुलावर तलवारीने वार करत जबर मारहाण केली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून, परिसरात दहशतचे वातावरण निर्माण झालं आहे.
ही घटना रविवारी सकाळी घडली. जहुर शेख (वय 28), सुलतान खान (वय 20), आझाद खान (वय 22) आणि मुस्तफा खान (वय 21) हे चारही आरोपी अचानक फिर्यादींच्या (YERWADA POLICE STATION) घरात घुसले. ‘माझ्या आईला का मारलं ?’ असं विचारत मुख्य आरोपी जहुर शेख याने तलवार काढून घरातील महिलेवर हल्ला केला. जीवाच्या आकांताने विनवण्या करणाऱ्या त्यांच्या मुलावरही हल्ला केला. दोघांवर तलवारीने वार करत मारहाण करून जखमी केलं. त्याचबरोबर इतर तीन आरोपींनी फिर्यादींच्या घरात घुसून गलिच्छ शिवीगाळ करत सामानाची तोडफोड केली. यामध्ये रहीसा महंमद शेख आणि साजिद शेख हे दोघे जखमी झाले असून त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात रक्ताचे थारोळे आणि तोडफोड झालेल्या वस्तू पाहून शेजाऱ्यांमध्येही भीती निर्माण झाली होती. तर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता संपूर्ण पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.
YERWADA POLICE STATION: येरवड्यात भरदिवसा घरात घुसून आई आणि मुलावर तलवारीने वार
या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यानं आता त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र ही आरोपी अजूनही अटकेत नसल्यानं त्यांना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.