Yavatmal News

Yavatmal News : उष्णतेमुळे कोळसा डेपोला भीषण आग; 10 हजार टन कोळशाची झाली राख

493 0

यवतमाळ : यवतमाळच्या (Yavatmal News) वणी परिसरातील लालपुलीया परिसरातील जुगलकिशोर अग्रवाल यांच्या एफसीआयच्‍या कोल डेपोला तीन दिवसांपुर्वी अचानक भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या भीषण आगीत सुमारे दहा हजार टनाच्‍या आसपास कोळसा जळून राख झाला आहे. दोन दिवसांपासून सलग धुसमत असलेल्या या आगीवर अखेर अग्निशमन दलाच्या पाच बंबातून फवारा मारून आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे. यामध्ये सुमारे 40 ते 45 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजत आहे.

हा कोळसा गुजरात येथील कंपनीला पाठविण्यात येत असून दररोज केवळ हजार टन कोळश्याची वाहतूक होत असल्याने या ठिकाणी सहा ते सात रॅक कोळशाची साठवणुक होती. होळीच्या दिवशी साठवणूक केलेल्या कोळशाला अचानक आग लागली आणि त्यानंतर या आगीने रौद्ररूप धरण करत संपूर्ण डेपोवर ताबा मिळवला. यात एक मशीनसुद्धा जळून खाक झाल्याचे समोर आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला हाय अलर्ट

Clove Side Effects : ‘या’ लोकांनी उन्हाळ्यात चुकूनही करू नये लवंगाचे सेवन; होतील ‘हे’ दुष्परिणाम

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मिळाला दिलासा ! दानवे, खैरेंचं अखेर झालं मनोमिलन

Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Crime : पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; ‘त्या’ व्यक्तीने वेधले सगळ्यांचे लक्ष

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!