नुकताच प्रसिद्ध रील स्टार अभिषेक साठे यानं आत्महत्या केल्यामुळे सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आता दुसरीकडे एका प्रसिद्ध रील स्टारची हत्या झाली. आणि त्याची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर चक्क त्याच्या वडलांनी केली आणि त्याचा मृतदेह चक्क धरणात पुरला. नेमकं हे सगळं प्रकरण काय, हा रील स्टार कोण आणि त्याची हलक्या नेमकी का केली पाहूया.
या प्रसिद्ध रील स्टारचं नाव आहे की विकी उर्फ हितेश विठ्ठल… विकी हा जळगावच्या भोरखेडा परिसरात वास्तव्यास होता. तो अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर रिल्स बनवायचा. त्याचं लग्न झालेलं असून नुकताच त्याला मुलगा झाला होता. तो आपल्या पत्नी आणि मुलासह बनवत असलेल्या रील व्हायरल होत होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांकडून त्याचा शोध सुरू होता. यातच विकी पाटील याचे वडील विठ्ठल सखाराम पाटील यांनी मंगळवार 25 फेब्रुवारीला गळफास लावून जीवन संपवलं. त्यानंतर त्यांनी आत्महत्ये पूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली. त्यात त्यांनी, ‘माझ्या मुलाची हत्या मीच केली असून त्याचा मृतदेह धरणात पुरला आहे’, असं लिहिलं होतं. ही सुसाईड नोट सापडताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. पोलिसांची टीम तात्काळ धरणाच्या भागात पोहोचली व खोदकाम सुरू केलं. गुरूवार दुपारी भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात विकीचा जमिनीत पुरलेला मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी जेसेबीच्या मदतीन मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र यानंतरही विठ्ठल पाटील यांनी विकीची हत्या का केली याचा उलगडा होत नव्हता. मात्र अखेर आता या हत्ये मागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. विकी हा लग्न झाल्यानंतर आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. मात्र तो वारंवार दारू पिऊन आई-वडिलांचा छळ करायचा. त्याने अनेकदा वडिलांना मारहाण केली होती. त्याचे वडील विठ्ठल पाटील हे माजी सैनिक होते. त्यांना मुलाचं हे वागणं पटत नव्हतं. त्यामुळेच त्यांनी त्याची हत्या केल्याचं तपासातून समोर आलं आहे.
वडील विठ्ठल पाटील यांनी पहिल्यांदा विकीचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळला. त्यातच गळफास लागल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह धरण परिसरात जमीन खोदून पुरला. त्यानंतर विठ्ठल यांनी स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील आणि लेकाच्या जाण्याने गावात शोककळा पसरली असून विकी ची पत्नी आणि त्याच्या बाळाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. तसेच त्याच्या एकाएकी जाण्याने त्याच्या फॉलोवर्स कडूनही दुःख व्यक्त केलं जात आहे.
UJWAL NIKAM| संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती