बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील, मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली असून बसवराज तेली हे या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत… कोण आहेत बसवराज तेली आणि त्यांची प्रशासकीय कारकीर्द कशी आहे जाणून घेऊयात ‘TOP NEWS मराठी’च्या ‘स्पेशल रिपोर्ट’मधून
मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली. या हप्त्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून आता एसआयटी समितीची स्थापना करण्यात आली असून बसवराज तेली हे या ‘एसआयटी’चे प्रमुख असणार आहेत. मूळचे बेळगाव जिल्ह्यातील खंदीबुदमधील असलेले बसवराज तेली हे 2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून बसवराज तेलींच्या पोलिस खात्यातील सेवेला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या ठिकाणाहून सुरुवात झाली.
त्यानंतर त्यांनी नागपूर शहर पोलीस उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर येथे अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे येथे शहर उपायुक्त आणि सांगलीचे पोलीस अधीक्षकपद सांभाळलेले आहे. सध्या बसवराज तेली हे ‘सीआयडी’चे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
सीआयडीच्या दहा जणांच्या टीममध्ये कुणाचा समावेश?
- बसवराज तेली पोलीस महानिरीक्षक गुन्हे शाखा, सीआयडी
- अनिल गुजर – पोलीस उपअधीक्षक
- विजयसिंग शिवलाल जोनवाल- सहाय्यक पोलीस निरीक्षक
- महेश विघ्ने – पोलीस उपनिरीक्षक
- आनंद शंकर शिंदे- पोलीस उपनिरीक्षक
- तुळशीराम जगताप – सहाय्यक पोलीस निरीक्षक
- मनोज राजेंद्र वाघ – पोलीस हवालदार
- चंद्रकांत एस.काळकुटे – पोलीस नाईक
- बाळासाहेब देविदास अहंकारे – पोलीस नाईक
- संतोष भगवानराव गित्ते – पोलीस शिपाई
बसवराज तेलींच्या नेतृत्वाखालील एसआयटीला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणते धागेद्वारे मिळतात हे पाहाणं महत्त्वाचं असणार आहे…
SANTOSH DESHMUKH | संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ‘तो’ व्हिडीओ सीआयडीच्या हाती
VALMIK KARAD BEED: वाल्मिक कराड समर्थकांकडून कराडची इमेज क्लीन करण्याचे प्रयत्न