Crime

कर्मचाऱ्यासोबत वाद झालेला वाद मिटवायला गेला आणि जीवाला मुकला

1244 0

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांसोबत झालेला वाद सोडवून मॅनेजरच्या जीवावर बेतलं आहे. किरकोळ वादातून चक्क मॅनेजरचीच हत्या करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

त्यावेळी त्यांचा कर्मचाऱ्यासोबत वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी मॅनेजरने मध्यस्ती केली. मात्र वादाचं रुपांतर हणामारी आणि त्यानंतर संतापलेल्या अज्ञातांनी मॅनेजरचीच हत्या केली. कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या किरकोळ वादातून धारदार शस्त्राने मॅनेजरची हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातल्या पेट्रोलपंपावर घडल्याची माहिती मिळाली आहे. मॅनेजरवर संतापलेल्या अज्ञाताने धारदार चाकूने सपासप वार केले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!