कल्याणमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या (kalyan girl case) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळी याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणारी त्याची पत्नी साक्षी गवळी हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्यात साक्षीने आरोपी पती विशाल गवळी (vishal gawali) ची साथ का दिली याबाबत मोठा खुलासा केला आहे.
कल्याण मधील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर विशाल गवळीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिची हत्याही केली. त्याची पत्नी साक्षी ही बँकेत नोकरी करते. ती संध्याकाळी घरी आल्यानंतर तिला घडलेला प्रकार समजला. त्या दोघांनी मिळून मुलीचा मृतदेह परीक्षांमध्ये टाकला. अमृता देह घेऊन दोघेही बाप गावच्या कब्रस्तान मध्ये गेले. तिथे दोघांनी मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावली.
इतकं सगळं झाल्यानंतरही निर्धारस्त असलेल्या विशाल गवळीने कल्याणच्या आधारवाडी भागात असलेल्या वाईन शॉप मधून दारूची बॉटल घेतली. यानंतर तो पत्नीच्या माहेरी शेगावला गेला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास लागल्यानंतर पोलिसांनी त्याला बायकोच्या माहेरहून अटक केली. त्याच्याबरोबर सह आरोपी असलेल्या साक्षीलाही अटक केली आहे. या दरम्यान साक्षीने विशालला या सगळ्यात मदत का केली ? ची माहिती तिने स्वतः पोलिसांना दिली आहे.
साक्षीने काय सांगितलं?
पतीने केलेल्या इतक्या मोठ्या पापात साक्षीने मदत का केली ? हे विचारताच तिने उत्तर दिलं. ‘मी जर विशालला या सगळ्यात मदत केली नसती तर त्याने मलाही मारलं असतं. मला विशालची भीती वाटते. त्यामुळेच मला विशाल सोबत कोर्टात हजर करू नका. तसं केलं तर तो मला ठार मारेल’, असं साक्षीने पोलिसांना सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता साक्षीला काय शिक्षा होते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.