Virar News

Virar News : गुडीपाढव्याच्या दिवशी 4 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

654 0

विरार : गुढीपाडव्याचा उत्साह सुरू असताना विरारमधून (Virar News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विरार पश्चिमेकडील रुस्तुम जी शाळेच्या बाजूला सेफ्टी टँकची सफाई सुरू असताना 4 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
विरार पश्चिम येथील S.T.P. प्लांटमधील चोकअप झाला होता. त्यामुळे दुरस्ती करण्यासाठी तेथील कर्मचारी गेला होता. पण बराच वेळ झाला तो काही परत आला नाही. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी दुसरा कर्मचारी गेला. पण तोही परत न आल्याने तिसरा कर्मचारी गेला. तिघेही परत न आल्याने चौथा त्यांना शोधण्यासाठी गेला. अशाप्रकारे चौघांचा एसटीपी प्लांटमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या दुर्दैवी घटनेमध्ये शुभम पारकर (वय 28), अमोल घाटाळ (वय 27), निखिल घाटाळ (वय 24), सागर तेंडुलकर (वय 29) अशी मृतांची नाव आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : सांगली शिवसेनेच्याचं पारड्यात, स्थानिक काँग्रेस नाराज; विश्वजीत कदम, विशाल पाटील नॉटरीचेबल

RBI: महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ने केली कारवाई, खात्यातून पैसे काढण्यावर ग्राहकांना बंदी

Maharashtra Premier League 2024 : KKR चा माजी अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंढे, अनिकेत पोरवाल कोल्हापूर टस्कर्सच्या ताफ्यात

अखेर महाविकास आघाडीतील सांगली भिवंडीच्या जागेचा तिढा सुटला; पहा कोणता पक्ष लढणार कोणती जागा?

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हाय अलर्ट

Downward Dog Pose : अधोमुख श्वानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!