Varandha Ghat Car Accident: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या हद्दीत असलेल्या वरंधा घाट परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारे २:३० वाजता एक भीषण (Varandha Ghat Car Accident) अपघात झाला. भोर-महाड रस्त्यावर, शिरगाव गावच्या हद्दीत एका रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळून हा अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच १२ एचझेड ९२९९ क्रमांकाची टोयोटा कार भोरकडून महाडकडे जात असताना, रस्तारुंदीकरणाचे (Varandha Ghat Car Accident) आणि मोऱ्या टाकण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी खोदलेल्या खोल खड्ड्यात पडली. हा अपघात अत्यंत पहाटेच्या वेळी झाला असून, पाऊस आणि दाट धुक्यामुळे रस्त्यावर पुरेसा प्रकाश आणि दृश्यमानता नव्हती. याच कारणामुळे चालकाला रस्त्यावरील खड्डा किंवा धोका वेळीच दिसला नाही आणि कार थेट खड्ड्यात कोसळली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या अपघातात राहुल विश्वास पानसरे (वय ४५, रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, गाडीतील अन्य प्रवासी राहुल देवराम मुतकुळे (वय ३२) हे गंभीर (Varandha Ghat Car Accident) जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रायगड जिल्ह्यातील महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासानुसार, हे दोघेही मुंबईहून गणपतीपुळे येथे प्रवासासाठी निघाले असल्याची शक्यता आहे.
DATTATREYA BHARNE & RAMESH PATIL AUDIO CLIP: राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा’
अपघाताची माहिती मिळताच, भोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत पोलीस हवालदार गणेश लाडकत, सुनील चव्हाण, अजय साळुंके आणि ज्ञानेश्वर शेंडे हे कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह बाहेर काढला आणि तो शवविच्छेदनासाठी भोर येथील उप-जिल्हा रुग्णालयात पाठवला. या बचावकार्यात पोलीस पाटील शंकर पारखे आणि वक्रतुंड क्रेन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पोलिसांना सहकार्य केले.
भोर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, अपघाताला नेमके कोणते कारण जबाबदार आहे आणि रस्तेकामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा मानकांचे पालन केले गेले होते की नाही, याचा कसून तपास करत आहेत. विशेषतः पावसाळ्यामध्ये घाट रस्त्यांवर गाडी चालवताना वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.