Crime

नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कहर; चोरट्यांनी पळवलं केंद्रीय मंत्र्याच्या आईचं मंगळसूत्र

574 0

नाशिक: नाशिकच्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी पळवले आहे.

बाईकवरून आलेल्या चोरांनी दोन ते अडीच तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावल्याची घटना घडल्याने नाशिक शहरात सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, नाशिक शहरात गेला अनेक दिवसांपासून चोरी,खून, दरोड्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शहरात नाशिक पोलीस आयुक्तांचा अंकुशच राहिला नसल्याचे प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहरातील प्रत्येक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी आणि चोरट्यांना, भामट्यांना पोलीसांचा धाक दाखवावा अशी भावना सामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जाते आहे…

Share This News
error: Content is protected !!