KOKAN SATARA ACCIDENT: कोकणात फिरायला गेलेल्या पुण्यातील मित्रांवर काळाचा घाला; दोघांनी गमावला जीव

KOKAN SATARA ACCIDENT: कोकणात फिरायला गेलेल्या पुण्यातील मित्रांवर काळाचा घाला; दोघांनी गमावला जीव

598 0

भीषण अपघातात पुण्यातील दोन मित्रांना आपला जीव गमावा लागला आहे. कोकणात फिरायला गेलेल्या पुण्यातील लोणी काळभोर येथील जीवलग मित्रांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हे दोघेही कारनं वाई येथील पसरणी घाट उतरत असताना (Satara Vai Accident) चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झाला. यामध्ये कार शंभर फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये चार मित्र प्रवास करत होते. त्यापैकी या दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहे.

अक्षय काळभोर, सौरभ काळभोर अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर वैभव काळभोर, बजरंग काळभोर अशी जखमी झालेल्या दोघांची नावं आहेत.दरम्यान आता जखमींवर वाई येथील बेलर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे चौघेही कोकणात फिरण्यासाठी गेले होते. दोन दिवस फिरून झाल्यानंतर होळीच्या सणासाठी चौघेही परत पुण्याला यायला निघाले होते. त्याचदरम्यान वाटेत हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. सह्याद्री आणि शिवेंद्रराजे या दोन रेस्क्यू टीमच्या मदतीने चारही जखमींना तात्काळ बाहेर काढण्यात आलं. मात्र त्यातील दोघांचा उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पंधरा दिवसांची मुलगी आणि गर्भवती पत्नी

मयत सौरभ हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला अवघ्या 15 दिवसांची मुलगी आहे. तर अक्षयचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी या दोन्ही मित्रांनी एकत्र येत पार्टनरशिप मध्ये एक जिम सुरू केली होती. मात्र त्यांच्या जाण्याने आता संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide