Pune Accident

Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात

592 0

पुणे : नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात (Pune Accident) घडला आहे. शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 ते 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती.

कसा घडला अपघात?
नाशिक-पुणे महामार्गावरून विठ्ठल नामाचा आणि साईनाथाचे नामस्मरण करत शिर्डीहून आळंदीकडे जाणाऱ्या भाविकांच्या दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन ते चार वारकरी जागीच ठार झाले आहेत. तर, नऊ ते दहा वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. आज सायंकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघाताला कारणीभूत असणारा ट्रक क्रमांक MH 12 VT 1455 वरील चालक मद्यपान करुन वाहन चालवत होता. ट्रक चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजत आहे. या अपघातातील मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाला अटक केली आहे. या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली. तसेच अपघातातील जखमींना तातडीने आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर; कल हाती यायला सुरुवात

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Telangana Election Result : महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या ‘राव’ यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ?

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Congress : काँग्रेसच्या पराभवाला ‘या’ चुका ठरल्या कारणीभूत; 1980 नंतर उत्तर भारतात सत्ता मिळवण्यात पहिल्यांदाच अपयश

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी-धीरज घाटे

Ladli Behna Scheme : मध्य प्रदेशच्या निवडणुकीत ‘लाडली बहना’ योजना ठरली ट्रम्प कार्ड

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!