Pune Crime

‘ते’ रेल्वे रुळावर झोपले अन् एक्सप्रेस अंगावरून गेली..; पुणे रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक घटना

386 0

पुणे रेल्वे स्थानकावर एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस रेल्वेच्या खाली येऊन दोन जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 6च्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अद्याप या दोन्ही व्यक्तींची ओळख पटली नसून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर एक्स्प्रेस गाडी आली होती. त्यावेळी या रेल्वेतून सर्व प्रवासी खाली उतरले. तर सकाळी ही गाडी पुन्हा यार्डच्या दिशेने निघणार होती. त्या दरम्यान एक महिला व एक पुरुष रेल्वे रुळावर जाऊन झोपले. काही वेळात त्यांच्या अंगावरुन रेल्वे गेली. ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र अद्याप या मृतदेहांची ओळख पटलेली नसून मृत व्यक्ती हे अंदाजे 35 ते 40 या वयोगटातील असण्याची शक्यता पोलीस आणि व्यक्त केली आहे.

Share This News
error: Content is protected !!