Crime

मित्र बनला वैरी; जेवणावरून झाला वाद आणि थेट….

578 0

पुणे: जेवायला दिलं नाही म्हणून एकानं आपल्याच मित्राच्या कानाचा चावा घेऊन त्याचा कानच तोडल्याची धक्कादायक घटना मार्केटयार्ड परिसरात शुक्रवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अनिकेत कांबळे (वय 35, रा. कात्रज) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे तर सचिन कुंभार (वय ३९, रा. कात्रज) असं फिर्याद तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन कुंभार आणि आरोपी अनिकेत कांबळे हे दोघे मित्र असून कात्रज भागात एकत्र वास्तव्यास आहेत. फिर्यादी सचिन कुंभार शुक्रवारी त्याच्या मैत्रिणी सोबत मार्केट यार्डातील फुल मार्केटच्या पार्किंगमध्ये बोलत बसला होता.

त्याच दरम्यान, आरोपी अनिकेत कांबळे तिथं आला आणि त्यानं सचिन कुंभार याच्याकडं मला खायला दे किंवा जेवायला चल, अशी मागणी केली. त्यावर सचिननं नकार दिल्यानंतर

अनिकेत यानं त्याला शिवीगाळ केली. या वादाचं रूपांतर भांडणात होताच अनिकेतनं सचिनला कानाचा जोरात चावा घेतला. त्यानं इतका जोरात चावा घेतला की, सचिनच्या

कानाची पाकळी तुटून पडली आणि तो गंभीर जखमी झाला. याप्रकणी सचिननं मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी अनिकेत कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!