ओढ्याजवळ होता गावठी दारूचा कारखाना; दारू बनवण्याच्या साहित्यासह पोलिसांची एकाला अटक

651 0

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्टी बनवणारा कारखाना चालू होता. हाच कारखाना पोलिसांनी उत्कृष्ट केला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

लोणीकंद परिसरातील अष्टापूर ग्रामपंचायत हद्दीतील फळीवस्ती येथील ओढ्यालगत गावठी हातभट्टी बनवली जात जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या जागेवर छापा मारला. त्यावेळी त्यांना हातभट्टी दारू बनवणारा कारखाना आढळून आला. त्याचबरोबर एक व्यक्ती दारू काढत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हा दारूचा कारखाना उध्वस्त केला. त्याचबरोबर सदर व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामभोला मकाशी नानावत (वय-20, रा. फळीवस्ती, अष्टापूर, ता हवेली, जि पुणे) असे गुन्हे शाखेनी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नानावत हा गावठी दारूचा कारखाना चालवत होता. याबद्दलची माहिती पोलिसांना मिळताच, कारखान्यातील सामान आणि नानावत याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी 2 हजार लीटर कच्चे द्रव पदार्थ (गुळ, नवसागर, तुरटी मिश्रित), 1 मोठा लोखंडी बॅरल आणि 35 लीटर तयार दारू असा एकूण 50 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ब)(क)(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!