Breaking News
crime news

महिलेला शेतात नेऊन अर्थनग्न करून लुटले; बारामती- भिगवन रस्त्यावरील धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

464 0

व्यायाम करण्यासाठी आलेल्या तीस वर्षीय महिलेला अर्धनग्न करत एक लाख पाच हजार रुपयांचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बारामती- भिगवण रस्त्यावरील वंजारवाडी चौकात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, वंजारवाडी चौकात सायंकाळ 6 च्या सुमारास एक 30 वर्षीय महिला व्यायाम करण्यासाठी आली होती. काही वेळ ती त्याच ठिकाणी चालत होती. काही वेळाने लघुशंकेच्या निमित्ताने ती शेजारील शेतात दिशेने निघाली असता तिचा अनोळखी इसमाने पाठलाग केला व तिच्या मागेच येऊन उभा राहिला. महिलेला काही समजायच्या आत त्याने तिच्या गळ्याला लावला आणि चाकूच्या धाकाने तिला अंगावरील सर्व दागिने काढायला लावले.

घाबरलेल्या महिलेने दागिने काढायला सुरुवात केली. मात्र त्याच वेळी त्याठिकाणी आणखी दोघेजण आले. त्यातील एकाने पीडितेचे तोंड दाबून तिचा मोबाईल हिसकावून घेत तिला थोड्या अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात नेले. तेथे चाकूचा धाक दाखवत तिच्याकडील सोन्याचे दागिने काढून घेतले. ज्यात मंगळसूत्र, कानातील टॉप्स, सोन्याची अंगठी असे एकूण १ लाख ५ हजार रुपयांचे दागिने होते. एवढ्या वरच हे दरोडेखोर थांबले नाहीत तर त्यांनी महिलेला कपडे काढण्यात सांगितले. महिलेने नकार दिल्यावर जबरदस्तीने तिच्या अंगावरील ओढणी फेकून देत तिच्या अंगावरील कपडे काढून फेकून दिले. अर्ध नग्न अवस्थेत या महिलेचे फोटो काढून मोबाईल तिथेच फेकून दिला आणि पसार झाले. घाबरलेल्या महिलेने तात्काळ पोलिसात धाव घेत या संदर्भात तक्रार नोंद केली आहे. याचा तपास आणि चोरट्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!