महिन्याभरात होणार होतं लग्न… इमारतीखालीच आढळला होणाऱ्या बायकोचा मृतदेह; पतीनं उचललं टोकाचं पाऊल

505 0

सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असू होणाऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही आपलं आयुष्य संपवलं आहे.

कल्याणी नगर भागात राहणाऱ्या युवतीचा इमारतीच्या खाली मृतदेह आढळून आला होता. कल्याणी नगर येथे इमारतीखाली सतरा वर्षीय मुलीचा मृत्यू आढळून आला होता. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडल्याने तिचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली होती.

मात्र ही आत्महत्या आहे की हत्या याचा उलघडा झालेला नसतानाच या मुलीचे ज्याच्याशी लग्न ठरले होते त्या मुलाने देखील आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही तरुणीसुद्धा पिंपरीतील खराळवाडी भागातच राहत होती. मात्र 14 मार्च रोजी कल्याणी नगर येथील एका इमारतीच्या खाली युवतीचा मृत्यूदेह आढळून आला होता. येरवाडा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र त्यानंतर युवतीच्या नातेवाईकांनी तिने आत्महत्या केल्याचे म्हटले. दरम्यान या घटनेनं पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!