DON ARUN GAWALI FULL STORY:  मुंबईचा सुपारी किंग ज्याने सुरुवातीला दाऊदसाठी दाऊदच्या विरोधी टोळ्यांचा फडशा पाडला

DON ARUN GAWALI FULL STORY: दाऊदलाही घाम फोडणाऱ्या “डॅडी”ची कहानी अंडरवर्ल्ड डॉन, आमदार, जन्मठेप ते 17 वर्षांनी जामीन…

66 0

DON ARUN GAWALI FULL STORY:  मुंबईचा सुपारी किंग ज्याने सुरुवातीला दाऊदसाठी दाऊदच्या विरोधी टोळ्यांचा फडशा पाडला

मात्र काही वर्षांनंतर दाऊदचा सगळ्यात मोठा शत्रू बनला. एकेकाळी संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्राच्या गुन्हेगारी क्षेत्रात आणि कालांतराने राजकीय क्षेत्रातही अधिराज्य गाजवणाऱ्या डॅडीला त्याच्याच दगडी चाळीत घुसून पोलिसांनी अटक केली.

त्या अटकेनंतर तब्बल 17 वर्षांनी अंडरवर्ल्डच्या डॅडीला जामीन मिळाला.

आणि पुन्हा डॅडीच्या दहशतीच्या चर्चा रंगू लागल्या.

अरुण गवळी याला जन्मठेपेची शिक्षा मिळालेलं ते प्रकरण कोणतं ?

अनेकदा अर्ज करूनही 17 वर्षांनी जामीन कसा मिळाला ?

आणि आता डॅडीची शिक्षा कमी होणार का ? पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून… DON ARUN GAWALI FULL STORY:

1955 मध्ये अहिल्यानगरमध्ये जन्माला आलेला अरुण गुलाब गवळी..

पहिल्यांदा गिरणी कामगाराचा मुलगा होता, पुढे गुन्हेगारीत पाऊल ठेवलं,

रामा नाईक टोळीचा सदस्य झाला. पुढे रामा नाईक, बाबू रेशीम

आणि अरुण गवळी यांनी मिळून BRA टोळीची सुरुवात केली.

आणि किरकोळ सुपारी किंग वाटणारा गवळी काही वर्षातच अंडरवर्ल्डचा ‘डॉन’ बनला.

दगडी चाळ हा त्याचा बालेकिल्ला होता.

जिथून त्याने 70-80च्या दशकातला देशातला सगळ्यात मोठा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ‘डी-कंपनी’लाही आव्हान दिलं

. मुंबईतील अनेक टोळ्यांशी संघर्ष करून “गवळी टोळीनं” आपलं वर्चस्व सिद्ध केलं.

दरम्यान अनेकांच्या रक्ताने माखलेल्या अरुण गवळींचे हात आता राजकीय झेंड्याकडे वळू लागले होते.

1997 मध्ये गवळी यांनी अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना केली.

डॅडीच्या टोळीत सामील होण्यासाठी जसे गुन्हेगार उत्सुक असायचे त्याच पद्धतीने त्याच्या या पक्षातही अनेक कार्यकर्ते हौसेने सामील झाले.

बघता बघता 2004 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी हा चिंचपोकळी मतदारसंघाचाआमदार म्हणून निवडून आला.

एकीकडे राजकीय शक्ती वाढत असताना दुसरीकडे अंडरवर्ल्डमधील डॅडीची आणि त्यांच्या टोळीची दहशतही कमी झालेली नव्हती.

पडद्यामागून टोळीची सूत्र आमदार झालेले अरुण गवळी चालवत होते.

https://youtube.com/shorts/l5Bjqv_A5FA

मुंबईत घडणाऱ्या अनेक सामाजिक, राजकीय आणि गुन्हेगारीशी निगडित घटनांचे आदेश हे दगडी चाळीतूनच यायचे.

आणि असाच एक आदेश डॅडीला जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत घेऊन गेला.‌

 

तारीख 2 मार्च 2007… संध्याकाळचे पावणे पाच वाजले होते.

असल्फा व्हिलेजमधील रुमानी मंझीलच्या चाळीत अंदाधुंद गोळीबाराचा आवाज झाला.

आणि लोकांना दिसला तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांचा मृतदेह..

जामसांडेकर आपल्या चाळीतील घरामध्ये टीव्ही बघत बसले होते.

PCMC CRIME NEWS: पुण्यात वैष्णवी नंतर दिव्याचाही गेला जीव पतीसह सासरच्यांवर हत्येचा आरोप

त्यांनी अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचा अवघ्या 367 मतांनी पराभव केला होता

. निवडणुकीच्या निकालाला अवघा एक महिनाही सरलेला नसताना जामसांडेकर यांच्या हत्येचा कट रचला गेला.

या हत्येसाठी 30 लाख रुपयांची सुपारी सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडेने दिल्याचं समोर आलं.

सुर्वे स्थानिक बांधकाम व्यवसायिक, तर साहेबराव भिंताडे जामसांडेकरांचे माजी सहकारी होते.

सूर्वेंचे जामसांडेकरांशी जागेवरून वाद होते.

त्यातूनच जामसांडेकर यांच्या हत्येसाठी सुर्वे आणि भिंताडे यांनी प्रताप गोडसे आणि अजित राणे यांच्याशी संपर्क केला.

त्यांच्या माध्यमातून गवळीच्या अनेक मध्यस्थींशी बोलून सुर्वे आणि भिंताडे यांनी थेट गवळीची भेट घेतली.

30 लाखांची सुपारी देऊन जामसांडेकरांचा गेम वाजवायचं ठरलं. 2 मार्चला बाईक वरून आलेल्या चौघांनी जामसांडेकरांवर हल्ला केला.

घरात घुसून गोळ्या झाडल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावर पोलिसांना केवळ एक पुरावा सापडला तो होता बंदुकीचा तुटलेला ट्रिगर..

वर्षभर लोटल्यानंतरही या प्रकरणातल्या आरोपींचा आणि सूत्रधाराचा शोध लागत नव्हता.

दुसरीकडे 26 एप्रिल 2008 ला काळबादेवीच्या ज्वेलरी शॉपमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक केली

. पोलिसांनी विजय गिरी, अशोककुमार जयस्वाल, नरेंद्र गिरी आणि अनिल गिरी यांना ताब्यात घेतलं.

त्यांच्याकडे ट्रिगर तुटलेली बंदूक सापडली

. याची कसून चौकशी केल्यानंतर याच बंदुकीने जामसांडेकरांची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं.

मारेकऱ्यांच्या चौकशीतून ही सुपारी अजित राणे आणि प्रताप गोडसे यांनी दिल्याचं निष्पन्न झालं.

त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सुर्वे आणि भिंताडे यांची नावं समोर आली.

आतापर्यंत पोलिसांना सूत्रधार समजले होते मात्र सूत्रधारांचीही सूत्र हलवणारं म्हणजेच आदेश देणारं नाव होतं अरुण गवळी…

मुंबई पोलिसांनी डॅडीच्या दगडी चाळीत घुसून त्याला अटक केली.

महाराष्ट्राच्या राजकीय आणि गुन्हेगारी क्षेत्रात ही घटना प्रचंड दुर्मिळ आणि तितकीच खळबळ जनक ठरली.

मुंबई सेशन्स कोर्टाने अरुण गवळी आणि इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

गवळीची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली. या 17 वर्षात त्याने पॅरोल आणि फर्लोचा तब्बल 16 वेळा लाभ घेतला आहे.

गवळीने शिक्षेतील सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केला होता.

त्यावर नागपूर खंडपाठीने दिलेल्या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपिलावरील सुनावणीही सुरू आहे.

त्यामुळे अरुण गवळीचं वय, आतापर्यंत भोगलेली शिक्षा आणि

अपिलाची रखडलेली सुनावणी लक्षात घेऊन न्यायालयाने अटी आणि शर्तींवर त्याला जामीन मंजूर केला.

पांढराशुभ्र कुर्ता घालून तुरुंगात गेलेल्या डॅडी पांढरा शुभ्र कुर्त्यातच तुरुंगातून बाहेर पडला.

फरक होता तो पांढरे झालेले केस आणि दाढीचा, काहीशा थकलेल्या शरीराचा आणि कुणालाही न चुकलेल्या वयाचा…

तुरुंगातून सुटलेल्या डॅडीला पाहण्यासाठी भेटण्यासाठी अनेकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली.

माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया न देता स्मित हास्य करत डॅडी दगडी चाळीत दाखल झाला.

कुटुंबीयांकडून स्वागतही झालं मात्र शिक्षेविरुद्ध केलेल्या अपिलाचा निर्णय येत नाही किंवा शिक्षेतील

सवलतीबाबतही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत गवळीवरील तुरुंगाची टांगती तलवार कायम असणार आहे.

 

Share This News
error: Content is protected !!