Beed:

जावयाने ‘तसले’ व्हिडिओ चक्क सासूला पाठवले; पत्नीने दाखल केला पती विरोधात गुन्हा

146 0

पुण्यातून रोज नवनवीन धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक अजब घटना पुण्यात घडली आहे. आपल्या पत्नी बरोबर एकांतात घालवलेला वेळ, कॅमेऱ्यात कैद करून त्याचे व्हिडिओ बनवून चक्क पत्नीच्या आईला म्हणजेच सासूलाच पाठवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विक्षिप्त जावया विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी यांचा विवाह झाल्यानंतर पतीबरोबर सर्वकाही चांगलं सुरू होतं.
त्यानंतर अचानक त्यांच्या पतीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून त्यांचा मानसिक छळ केला. त्यांच्यात मोठे वाद झाले आणि या महिलेचा पती त्याच्या मुळ गावी निघून गेला.

त्यानंतर याच रागाच्या भरात त्याने फिर्यादी महिला म्हणजे स्वतःच्या पत्नीसोबतचे प्रायव्हेट फोटो व व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले. हे अकाउंट देखील त्याने पत्नीच्याच नावे उघडले होते. यावर आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ पोस्ट करून पत्नीची बदनामी केली. एवढ्यावरच न थांबता त्याने चक्क ते व्हिडिओ फिर्यादीच्या आईच्या व्हॉटसअपवर पाठवून त्यांचा विनयभंग केला. या प्रकरणी पत्नीने फिर्याद दिली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे

Share This News
error: Content is protected !!