Crime

पुण्यातील हत्यांचं सत्र थांबेना! काळेवाडीत सिमेंटच्या ठोकळ्याने ठेचून हत्या केलेला मृतदेह फूटपाथवर सापडला

210 0

पुण्यातील हत्यांचं सत्र संपत नसतानाच आता पिंपरी चिंचवड मधून देखील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी परिसरातील फूटपाटवर एका अज्ञात इसमाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी या मृतदेहाबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. काळेवाडी परिसरातील फुटपाथवर ठेवलेल्या दोन बेंचच्या मध्ये हा मृतदेह लपून ठेवण्यात आला होता. शेजारीच रक्ताने माखलेला सिमेंटचा ठोकळा देखील पडला होता. त्यामुळेच या इसमाची हत्या या सिमेंटच्या ठोकळ्याने ठेचून झाली असण्याची प्राथमिक शक्यता आहे.

तसा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून हा गुन्हा रात्री तीनच्या नंतर घडला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याबाबतीत अजून कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही.

त्यामुळेच पोलिसांनी सध्या अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास वाकड पोलिसांकडून सुरू आहे. तरी या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

Share This News
error: Content is protected !!