इकडे पोलिसांची शोध मोहीम तिकडे कराडचं देव दर्शन; पुण्यातील ती महिला कोण जीच्याकडे वाल्मीकने मुक्काम केला ?

WALMIK KARAD: इकडे पोलिसांची शोध मोहीम तिकडे कराडचं देव दर्शन; पुण्यातील ती महिला कोण जीच्याकडे वाल्मीकने मुक्काम केला ?

974 0

21 दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळणारा वाल्मीक कराड (walmik karad)31 डिसेंबरला स्वतःहून सरेंडर झाला. इकडे या 21 दिवसांत दीडशे पेक्षा जास्त पोलीस कराडला शोधत होते तर दुसरीकडे कराड मात्र देवदर्शन करत होता. त्याने समर्थकांच्या गाठीभेटी घेतल्या. काहींच्या घरी मुक्कामाही केला. अनेकांनी त्याला मदतही केली. आणि आता हे सगळेच जण सीआयडी (CID) च्या रडारवर आलेत. त्यातच कराडने पुण्यातील महिलेच्या घरी मुक्काम केल्याची माहिती मिळाल्याने ही महिला नेमकी कोण हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचा देशमुख यांच्या हत्येशी संबंध जोडण्यात आला. त्या संदर्भातले पुरेसे पुरावे मिळाले नसले तरीही कराडचा यामध्ये सहभाग असल्याचे आरोप होऊ लागले आणि लागलीच कराडने बीड सोडलं. देशमुख यांच्या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी कराड परळी मधून थेट देवदर्शनाला निघाला.

वाल्मीक कराड कुठे कुठे गेला? 

9 डिसेंबर : वाल्मिक कराड परळीमधून पडला बाहेर

10 आणि 11 डिसेंबर : लोकेशन – उज्जैन (मध्यप्रदेश) – महाकाल मंदिर परिसर

11 डिसेंबर : लोकेशन – उज्जैन (मध्यप्रदेश) – सोशल मीडियावर एक फोटो केला पोस्ट

12 डिसेंबर : लोकेशन – परळी – भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट

13 डिसेंबर – लोकेशन समजू शकलं नाही.

14 डिसेंबर – लोकेशन समजू शकलं नाही – दत्तजयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट

15 डिसेंबर – लोकेशन समजू शकलं नाही – धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा देणारी सोशल मीडियावर पोस्ट

16 डिसेंबर – लोकेशन – मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्य (मध्यप्रदेश) – त्यानंतर वाल्मिक कराड गायब

17 डिसेंबर – लोकेशन – पुणे आणि त्याच दिवशी फरार, फोनही बंद

सौ चुहे खाकर…

आपण गुन्हा केलाय आणि पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागू नये, म्हणूनच कदाचित दुसऱ्याच दिवशी परळी सोडून कराडने थेट उज्जैन गाठलं. तेव्हा त्याच्याबरोबर सात ते आठ लोक होते, ज्यामध्ये एक अंगरक्षक पोलीस देखील होता. उज्जैन नंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यात देखील त्याने धार्मिक पर्यटन केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कराडचं हे धार्मिक पर्यटन म्हणजे सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली, असंच काहीसं म्हणावं लागेल. पोलिसांनी पकडण्याच्या भीतीने वाल्मीक कराडने थेट राज्य सोडलं. आधी मध्य प्रदेश नंतर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आणि सर्वात शेवटी तो पुण्यात आला. ही तीनही राज्य फिरताना त्याचा फोन चालू होता. सोशल मीडियावर त्याच्या कडून किंवा त्याच्या टीम कडून पोस्ट करण्यात येत होत्या. मात्र तोपर्यंत राज्यात वाल्मीक कराड विरोधात रान उठलं होतं. आपला पाय आणखी खोलात जात असल्याचं कराडला समजताच तो विश्वासू निकटवर्तीयांकडे पुण्यात आला. 17 डिसेंबरला फोन बंद करून त्याने पुण्यात मुक्काम केला.

ती महिला कोण ?

या प्रकरणांमध्ये तब्बल 115 जणांना चौकशीसाठी बोलावलं होतं. यामध्ये कराडच्या पत्नी आणि भावासह निकटवर्तीय महिलांचा देखील समावेश होता. पुण्यातही वाल्मीक कराड वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटला आणि एका महिलेकडे त्याने मुक्काम आहे केला. ही माहिती समोर आल्यानंतर ही महिला नेमकी कोण ? ही महिला केवळ कराडची विश्वासू आहे ? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पदाधिकारी आहे ? की कराडचे आणि तिचे आणखी काही संबंध आहेत ? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत

सीआयडीच्या रडारवर

21 दिवसांमध्ये कराड बरोबर त्याचे विश्वासू लोक होते. अनेकांनी त्याच्याबरोबर प्रवास केला. वेळोवेळी आपला ठाव ठिकाणा बदलला. कराडला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवणे, त्याच्यासाठी पैशांची व्यवस्था करणे, वाहनाची आणि मुक्कामाची व्यवस्था करणे, पोलिसांपासून त्याला लपवणे अशा अनेक गोष्टींचं नियोजन करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कामाला लावण्यात आली होती. याच यंत्रणेत असलेला आणि वाल्मीक कराडला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मदत केलेला प्रत्येक जण आता सीआयडीच्या रडारवर आला आहे.

SANTOSH DESHMUKH CASE: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी फरार घोषित; अटक होणार की शरण येणार ?

https://www.topnewsmarathi.com/politics/three-accused-in-santosh-deshmukh-murder-case-declared-as-a-most-wanted-criminal/#google_vignette

Share This News
error: Content is protected !!