पुण्यातील मावळ तालुक्यात सरपंचाचा निर्घृण खून; आरोपी फरार

19779 0

पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. तालुक्यातील प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचावर अज्ञात आरोपींनी कोयत्यानं वार करत जीवघेणा हल्ला केला.

प्रवीण साहेबराव गोपाळे हे शिरगाव गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान सरपंच होते. काही दिवसांपूर्वीच शिरगाव ग्रामपंचायत संपूर्णतः बिनविरोध आल्याने जिल्ह्यात याची मोठी चर्चा झाली होती.

या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेच्या काही मिनिटांनी पिंपरी- चिंचवड पोलिसांचा मोठा फौज फाटा दाखल झाला आहे. अज्ञात आरोपींचा शोध सीसीटीव्हीद्वारे पोलिस घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी शिरगाव ग्रामपंचायत ची निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी गटाचे प्रवीण गोपाळे हे सरपंच पदी विराजमान झाले होते. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

 

Share This News
error: Content is protected !!