Pune Crime News

विकृतीचा कळस! 85 वर्षीय महिलेवरील अत्याचारानं पुणे हादरलं

254 0

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मागील अनेक दिवसापासून गुन्हेगारीच्या वाढत्या घटना घडत असून आता अशीच एक धक्कादायक माणुसकीला काळी माफ असणारी आणि विकृतीचा कळस गाठणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. 85 वर्षीय महिलेवर नराधम तरुणांना जिन्यात फरपटत नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

घरात पाहुणे आले होते गप्पा सुरू होत्या आणि हीच वेळ या विकृत नराधमानं संधी साधली आणि 85 वर्षीय वृद्ध महिला घराबाहेर पडत असताना या नराधमानं या महिलेला फरफट जिन्यात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला पाहुणे गेल्यानंतर घरातील मंडळींनी या वृद्ध महिलेची शोधाशोध केली त्यावेळी महिला जिन्यात जखमी अवस्थेत विव्हळत पडल्याचं दिसून आलं हा संपूर्ण धक्कादायक प्रकार सोमवारी 23 सप्टेंबर रोजी उघडकीस आलाय. या प्रकरणी पीडित महिलेच्या 57 वर्षीय मुलींना हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून नराधम आरोपी ओम जयचंद पुरी (वय 23 राहणार साखरेवाडी मूळ राहणार धाराशिव) याला अटक करण्यात आली आहे. या नाराधमानं या वृद्ध महिलेचा गळा दाबला या महिलेला मारहाण केली आणि हा संपूर्ण धक्कादायक प्रकार तब्बल पाऊण तास सुरू होता प्रतिकार करत आरडाओरडा करत होती मात्र तिच्या मदतीसाठी कुणीही आलं नाही.

Share This News
error: Content is protected !!