Crime

मुलगी भांडी धुत होती, नराधम बापाने दार बंद केलं अन्… ; नाशिकमधील खळबळजनक घटना

170 0

राज्यात दररोज महिला अत्याचारांच्या गंभीर घटना समोर येत असून यामध्ये नातलगांनी किंवा ओळखीच्या व्यक्तींनीच अत्याचार केल्याच्या घटना या जास्त आहेत. अशीच घटना नाशिक रोड परिसरात घडली. या परिसरात सावत्र बापाने आपल्या 13 वर्षीय मुलीवर भर दिवसा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नाशिकरोड परिसरात रविवारी म्हणजेच 22 सप्टेंबरला सायंकाळी माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पीडित मुलीची आई ही आपल्या दोन लहान मुलींना घेऊन किराणा दुकानात गेली होती. त्यावेळी हा सावत्र बाप घरात टीव्ही पहात बसला होता. तर पीडित मुलगी ही घराबाहेर भांडी धुत होती. पत्नी बाहेर गेल्याचे लक्षात येताच या नराधमाने बाहेर काम करत असलेल्या सावत्र मुलीला घरात बोलावलं. दार बंद करून घेतलं आणि तिच्यावर बळजबरी केली. घाबरलेली पीडित मुलगी जोर जोरात रडायला लागली. त्यावर नराधम बापाने चाकूचा धाक दाखवून मुलीच्या आई आणि बहिणीला मारून टाकण्याची धमकी देत पिडीतेतला तोंड बंद करायला सांगितलं.

काही वेळानंतर पीडित मुलीची आई ही किराणा घेऊन घरी आल्यानंतर मुलीवर झालेले अत्याचार तिच्या लक्षात आले. त्यानंतर तात्काळ तिने नाशिक रोड पोलीस ठाणे गाठून पतीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी सावत्र बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!