Crime

वीस वर्षांच्या मैत्रीचा निर्घृण अंत! आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याने मेव्हण्याने केला मित्र असलेल्या दाजीचा खून

776 0

वीस वर्षांपासून मित्र असलेल्या मित्रानेच बहिणीशी आंतरधर्मीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून मेव्हण्याने बहिणीच्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड भागात घडली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

अहिल्यानगर येथील पारनेर तालुक्यातील रांधे इथे राहणाऱ्या अमिर शेखचे शेजारीच राहणाऱ्या मुली बरोबर प्रेम संबंध होते. चार महिन्यांपूर्वी त्यांनी आळंदी येथे राहायला आले. मात्र त्यांचा हा विवाह मुलीच्या भावाला मान्य नव्हता. मात्र आरोपी आणि अमिर हे वीस वर्षांपासून शेजारी राहत असल्यामुळे त्यांची चांगली मैत्री होती. दोन्ही कुटुंबांमध्ये सलोखा होता. मात्र या विवाह मुळे त्यांच्या मैत्रीत तडा गेला. त्यामुळे त्याने आमिरला गोड बोलून 15 जून रोजी दारू पिण्यासाठी बोलावले. त्यानंतर आदर्श नगर परिसरातून त्याचे अपहरण केले व गळा आवळून त्याचा फोन केला. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आळंदी चाकण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी नेऊन जाळला. व मृतदेहाचे अवशेष नदीत फेकून दिले.

या दरम्यान, अमिर घरी न आल्याने त्याच्या पत्नीने तो बेपत्ता झाल्याची तक्रार भोसरी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र अमिरच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला व अखेर या खूनाचा उलगडा झाला.

याप्रकरणी पंकज विश्वनाथ पाईकराव, गणेश दिनेश गायकवाड, सुशांत गोपाळ गायकवाड, सुनील किसन चक्रनारायण या चार जणांनी विरोधात भारतीय दंड संहिता कलम 364, 302, 201, 120 ब आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची तपासनंतर पंकज पाईकराव, सुशांत गायकवाड आणि सुनील चक्रनारायण यांना अटक करण्यात आली आहे. तर गणेश दिनेश गायकवाड हा अद्याप फरार आहे.

Share This News
error: Content is protected !!