पोलिसांच्या बेडीतून अलगद हात काढून मोक्क्यातील आरोपी पसार; येरवड्यातील अजब घटना

323 0

‘आपल्याला त्रास होत असून लवकर पाणी आणा नाहीतर काहीतरी होईल’, अशी भीती दाखवून पोलिसांना पाणी आणायला पाठवून आरोपीने हातातील बेडी काढून पलायन केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली आहे.

निखील मधुकर कांबळे (वय 28, रा. प्रज्ञासागर, बौद्ध विहार, लक्ष्मीनगर, येरवडा) असे पळून गेलेल्या गुंडाचे नाव आहे. हा धक्कादायक प्रकार गुंजन चौकात सोमवारी रात्री पावणेदहा वाजता घडला.

याबाबत पोलीस अंमलदार सुशांत राजेंद्र भोसले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोक्का गुन्ह्यातील आरोपी निखील कांबळे, सुदेश ऊर्फ बाब्या रुपेश गायकवाड (वय 22, रा. येरवडा) आणि अतिब अखील सय्यद ऊर्फ भांडा (वय 19, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांना अटक केली होती. त्यावेळी निखिल कांबळे याने आपल्या पोटात दुखत असल्याचे सांगितल्याने त्याला तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आलं.

वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर आपल्या डाव्या हातातील बेडी जास्त जाम झाली आहे. थोडी लूज करा असं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या चावीने बेडी लूज केली. ससून मधून निघाल्यानंतर या आरोपींना घेऊन पोलिसांची गाडी पावणेदहाच्या सुमारास येरवडा पोलीस ठाण्याकडे निघाली होती. त्यामुळे फिर्यादी पोलीस अधिकारी गाडी चालवत होते तर आणखी एक पोलिस अधिकारी मागे बसले होते. त्यावेळी गुंजन चौकात गाडी आली असताना निखिल कांबळे हा मोठ मोठ्याने ओरडून मला जास्त त्रास होत आहे, मला पाणी द्या नाही तर मला काहीतरी होईल, असं म्हणू लागला. त्यामुळे शेजारी बसलेले पोलीस अधिकारी ओंबासे हे पाणी आणण्यासाठी गेले. त्याचवेळी लूज केलेल्या बेडीतून कांबळे यांनी अलगत हात काढून घेतला. गाडीचा दरवाजा उघडला आणि पळ काढला.

पोलिसांनी तात्काळ त्याचा पाठलाग केला मात्र अंधार असल्यामुळे पोलीस त्याला पकडू शकले नाहीत. ज्यामुळे हा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. सध्या पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!