औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार महाराज व एक महिला कीर्तनकार यांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या कीर्तनकारावर कारवाई करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तृप्ती देसाई म्हणतात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असून अनेक कीर्तनकार समाजप्रबोधनाचं काम करतात मात्र अलीकडील काळात त्याला बाजारुपणाचे स्वरूप आले आहे.