पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार (swargate case) प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे (datta gade) याचे अनेक कारणामे समोर येत आहेत. गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं याआधीच स्पष्ट झालं आहे. मात्र आता त्याचा जो कारनामा समोर आला आहे त्यावरून गाडेच्या अनेक प्रतापांवर शिक्कामोर्तब होतय.
आरोपी दत्ता गाडे याच्या विषयी तपासात अनेक खळबळ जनक माहिती समोर येत आहे. दत्ता गाडेचा पोलीस गणवेशातील एक फोटो व्हायरल होतोय…गाडे हा स्वारगेट आणि आजूबाजूच्या परिसरात पोलिसाच्या गणवेशात फिरायचा. पोलीस असल्याच सांगून तरुणींना तो फसवायचा अशी चर्चा होती. त्याच्या या फोटोची जोरदार चर्चाही सुरू झाली आहे. पण या सगळ्यातून दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार आहे हे मात्र अगदी स्पष्ट झाल आहे.. दत्ता गाडे बसस्थानक परिसरात पोलीस गणवेशात फिरायचा. त्याच्या अंगावरील पोलिसाचा गणवेश पाहून प्रत्येकाला तो पोलीस असल्याचच वाटायच. गाडेने पोलिसाच्या वेशातील फोटोही काढले असावेत.. त्याच्या मोबाइलमध्ये हे फोटो आढळून आले होते. गाडेला याआधीही पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यावेळी त्याच्या मोबाइलमध्ये असे काही फोटो आहेत ही बाब पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही… त्याचवेळी पोलिसांनी त्याचा कसून तपास का केला नाही. असा सवाल उपस्थित केला जात आहे…दत्ता गाडे याला गेल्यावर्षी स्वारगेट पोलीसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हा त्याच्या मोबाईलमधे आढळलेला हा फोटो आहे.
आपण पोलीस आहे अशी बतावणी करुन पोलीस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करु शकतो अस सांगत दत्ता गाडे अनेक मुलींशी ओळख वाढवायचा .गाडेने परिधान केलेला हा पोलिसाचा गणवेश नक्की कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याचा होता की त्याने तो शिवून घेतला होता याचा तपास होण्याची गरज आहे. बेकायदेशीररित्या पोलिसाचा गणवेश घालून एक आरोपी सरेआम फिरतोय ही बाब पोलिसांच्या लक्षात आली नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दत्ता गाडे सातत्याने स्वारगेट बस स्टँड परिसरात गिरट्या घालत असायचा…कधी पोलीस अधिकारी कधी बस कंडक्टर असल्याच भासवून त्यांनी अनेकांना लुटल होत.. त्याच्यावर वेगवेगळ्या बस स्टँड परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये सहा गुन्ह्यांची नोंद आहे. दत्तात्रय गाडे इतके दिवस पोलिसी गणवेशात फिरत असेल तर ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही हाच मोठा प्रश्न आहे..गाडे हा सराईत गुन्हेगार आहे, हे आधीच स्पष्ट झालेल आहे.. मात्र सध्या त्याचे जे एक एक कारणामे समोर येत आहेत ते मात्र मोठी खळबळ उडवून देणारे आहेत.