Maratha Reservation

Maratha Reservation : आणखी एक बळी ! मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

451 0

छत्रपती संभाजीनगर : राज्यात आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात पेटला आहे. तर दुसऱ्या बाजूला या आरक्षणासाठी (Maratha Reservation) लोकांच्या आत्महत्येचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष)‎‎ येथे आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, या 39 वर्षीय तरुणाने छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच ‎‎विष‎ ‎घेऊन आत्महत्या ‎‎केली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी (13 डिसेंबर) रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. विजय ‎पुंडलिक राकडे (वय 39 वर्ष, खामगाव, फुलंब्री) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो चिंतेत होता. याच चिंतेत त्याने बुधवारी खामगाव येथील छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेतले. त्याने विष घेतल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्याला‎ तत्काळ खासगी वाहनातून फुलंब्री येथे‎ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला ‎रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती‎ संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात ‎दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. यावेळी त्याच्याजवळ एक सुसाईड नोटदेखील आढळून आली.

सुसाईड नोटमध्ये काय लिहलं आहे?
विजय याने आत्महत्या करण्यापूर्वी एका सुसाईड नोट लिहिली होती. “माझ्या‎ मुलींना, मुलांना शिकवण्यासाठी मी‎ पूर्णपणे कटिबद्ध असतानाही माझ्या‎ मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात‎ त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही‎. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण‎ मिळावे, यासाठी मी आत्महत्या करीत ‎आहे, असे त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हंटले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pimpari Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

Loksabha Security Breach : संसद भवनाच्या घटनेनंतर 7 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

Maharashtra Weather News : मुंबई गारठणार ! राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!