Kolhapur Crime News

Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा; पोलिसांसमोरच केली दगडफेक

595 0

कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना (Kolhapur Crime News) समोर आली आहे. यामध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा झाल्याचे समजत आहे. टेंबलाईवाडी परिसरात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही दगडफेक करण्यात आली. महत्वाचे म्हणजे पोलिसांसमोरच हा राडा झाला. या दगडफेकीच्या घटनेमध्ये अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लहान मुलांच्या वादातून ही हाणामारी आणि दगडफेक झाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
लहान मुलांच्या वादातून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. ताराराणी चौक आणि टेंबलाईवाडी नाका परिसरातील मुले रुक्मिणीनगरच्या शाळेत शिक्षण घेतात. किरकोळ कारणातून या मुलांच्या दोन्ही गटात वाद झाला. त्यानंतर काही जणांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र तरी देखील याचप्रकरणावरून टेंबलाईवाडी येथील काही तरुण शाळेत पोहोचले त्यांनी या मुलांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, यातूनच प्रकरण चिघळलं आणि रोजदार राडा झाला.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या 50 ते 60 जणांच्या टोळक्यानं हातात काठ्यालाठ्या आणि तलवारी घेऊन टेंबलाईवाडी नाका येथील घरांवर हल्ला केला. जमावाकडून परिसरात घुसून जोरदार दगडफेक करण्यात आली, घरांच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच वाहनांवर देखील हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र अजूनही परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Dandasana : दंडासन म्हणजे काय ? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News
error: Content is protected !!