Solapur Crime

Solapur Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

393 0

सोलापूर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूरच्या (Solapur Crime) शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे याच्यावर आर्थिक फसवणूक आणि दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर भादवि 420, 406, 506 आणि 34 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय मुनगा पाटील (वय-39 वर्षे, सृष्टी नगर, अक्कलकोट नगर, सोलापूर) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
दत्तात्रय मुनगा पाटील यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी मनिष काळजे यांनी चार चाकी वाहनाचा सौदा केला होता. यावेळी एक लाख रुपये ॲडव्हान्स देऊन काळजे यांनी वाहन नेले होते. मात्र, उर्वरित तीन लाख रुपये अद्याप मिळाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत दत्तात्रय पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शिवेसना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्यासह आकाश मुदगल या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत नेमके काय म्हंटले?
पोलिसांत विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा जुनी चारचाकी वाहने विक्रीचा व्यवसाय असून, ते पुणे, मुंबई येथून चारचाकी वाहने विकत आणून सोलापूर शहरात विकत असतात. दरम्यान, 4 जानेवारी रोजी विठ्ठल पाटील यांचे ओळखीचे आकाश मुदगल यांनी मनिष निकाळजे यांना चारचाकी गाडी घ्यायची असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पाटील यांनी त्यांना काही चारचाकी गाड्या दाखवल्या. यातील एक गाडी निकाळजे यांनी पसंद केली. यावेळी पाटील यांनी गाडीची किमंत सांगितली आणि त्यांचा चार लाखात सौदा ठरला. दरम्यान, यावेळी निकाळजे यांनी एक लाख रुपये ॲडव्हान्स देऊन उर्वरित तीन लाखाची रक्कम दोन दिवसांत देण्याचं सांगितले. मात्र, अनेकदा पैसे मागून देखील निकाळजे यांच्याकडून रक्कम येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची विठ्ठल पाटील यांची खात्री झाली.यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Share This News
error: Content is protected !!