Sikandar Shaikh Arrest: कोल्हापूरच्या गंगावेश तालमीच्या मातीत घडलेला आणि महाराष्ट्र केसरीच्या किताबावर आपलं नाव कोरणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख सध्या अडचणीत सापडला आहे. सिकंदर शेखला (Sikandar Shaikh Arrest) पंजाब मधून अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी त्याला शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे. पंजाबच्या सीआयए पथकाने पपला गुर्जर गॅंगला शस्त्र पुरवणाऱ्या रॅकेटचा भंडा फोड करत चार जणांना अटक केली. आणि त्यातच सिकंदर शेखचा ही समावेश आहे.
या रेडमध्ये पोलिसांनी एक लाख 99 हजार रुपये रोख रक्कम व पाच पिस्तूल व स्कॉर्पिओ- एन व एक्सयूव्ही अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत. हे आरोपी उत्तर प्रदेश मधून शस्त्र आणून पंजाब आणि आसपासच्या भागात (Sikandar Shaikh Arrest) विक्री करतात. हे तिघेही आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. हे गुन्हेगार हरियाणा आणि राजस्थान मध्ये सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर गँगशी थेट जोडलेले आहेत. परंतु सिकंदर शेख याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का? याचा तपास अद्याप सुरू आहे.
MANOJ JARANGE PATIL ON DEVENDRA FADANVIS: मनोज जरांगे पाटलांची सरकारवर टीका
या केसमध्ये मुख्य आरोपी असलेला दानवीरवर हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये खून, दरोडा, एटीएम फोडणे असे गुन्हे दाखल आहेत. 24 ऑक्टोबर रोजी दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी एक्सयुव्ही (Sikandar Shaikh Arrest) गाडीतून दोन पिस्तूल घेऊन मुहालीतील आले होते हे शस्त्राचे सिकंदर शेकडे देणार होते तर सिकंदर नीती नायगावच्या कृष्णा उर्फ हॅप्पीला देण्याचा प्लान केला होता पोलिसांनी एअरपोर्ट चौकातून तिघांना पकडले आणि मिळालेल्या माहितीनुसार 26 ऑक्टोबर रोजी कृष्णकुमार उर्फ हॅपी लकी अटक करण्यात आली त्याच्याकडून आणखी तीन विस्तृत जप्त करण्यात आली आहेत.
Pune Merto: पिंपरी-चिंचवड मेट्रो स्टेशन परिसराचे स्वरूप बदलणार!
सिकंदरचा प्रवास ‘ महाराष्ट्र केसरी ते शस्त्र तस्करी’
सिकंदर शेख आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू आहे महाराष्ट्राचा किताब असणाऱ्या महाराष्ट्र केसरी च्या गतीवर देखील त्यांनी आपले नावाची छटाऊन ठेवली आहे त्यांना आर्मी मध्ये क्रीडा कोट्यातून भरती घेतली होती मात्र काही काळानंतर त्यांना नोकरी सोडली. आता शिक्षण बीए पदवीधर असून तो विवाहित आहे. मागील पाच महिन्यांपासून तो पंजाब मधील मुल्लांपुर गरिबदास येथे भाड्याने राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार शस्त्रतसकरी साखळीतील मध्यसत्याची भूमिका तो बजावतो आहे.