Breaking News
Crime

धक्कादायक ! पोपटाची पिल्लं दाखवण्याच्या बहाण्यानं मित्राला ढकललं रेल्वे पुलावरून ; जलपर्णीमुळं बजावला

249 0

पुण्यात बोपोडीतील रेल्वे पूल परिसरात पोपटाची पिले दाखविण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय मित्राला पुलावरून नदीपात्रात ढकलून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

नदीपात्रात पडलेला मुलगा जलपर्णीमुळे बचावला. मुलगा नदीपात्रात पडल्यानंतर स्थानिकांनी मुलाला पाण्यातून बाहेर काढले.

नेल्सन एल. आर. शाम (वय १५) असे बचावलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी प्रशांत निकाळजे (वय १९, रा. बोपोडी) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नेल्सनची आई डॉर्थी सायमन एल.आर. शाम (रा. बोपोडी) यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!