तनिषा भिसे मृत्यू (TANISHA BHISE CASE) प्रकरणात ससून (Sassoon report) चौकशी समितीच्या अहवालातील निष्कर्ष समोर आले आहेत. हा अहवाल गोपनीय असला तरीही त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्याचबरोबर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
ससून अहवालातील निष्कर्ष
1. प्रकृतीत सुधारणा होत नसताना इंदिरा आयव्हीएफमध्ये चार-पाच दिवस दाखल करून घेणे ही चूक होती.
2. तनिषा भिसेंना दुसऱ्या रुग्णालयात जायचा सल्ला द्यायला हवा होता.
3. भिसेंची प्रकृती अतिशय नाजूक होती आणि अति जोखमीची परिस्थिती असताना मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालयात नेण्याची गरज होती.
4. मात्र मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालयात न नेता सूर्या रुग्णालयात नेण्यात आलं.
5. सूर्या रुग्णालयात भिसेंची प्रसूती झाली मात्र त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता होती, त्यावेळी कार्डियेक स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध नव्हते.
6. तनिषा भिसेंना हार्ट अटॅक येण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर त्यांना दोन तास सीपीआर दिला जात होता.
7. मणिपाल रुग्णालयात भिसे यांचा माता मृत्यू झालेला असूनही शवविच्छेदन करण्यात आलं नाही.
8. मृत्यू झाल्यानंतर ससून रुग्णालयाला कळवलं नाही.