नागपूर : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण (Bus Accident) वाढताना दिसत आहे. नागूपरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. यामध्ये एसटी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये ब्रेक फेल झाल्याने बस अनियंत्रित झाली आणि तिने आगारात पार्किंगमध्ये उभा असलेल्या चार दुचाकी वाहनांना धडक दिली. यानंतर ही बस सुरक्षा भिंतीवर आदळली आणि थांबली.
एसटी बसची धडक एवढी भीषण होती कि, यात सुरक्षा भिंतही पडली.मात्र सुदैवाने या अपघातात चालक बचावला. या घटनेमुळे, अनफिट एसटी रस्त्यावर धावतात का? असा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जात आहे. नागपूरच्या वर्धमान नगर आगारातून चालक (MH 14 BT 1253) ही बस देवरी येथे जाण्यासाठी काढत असताना हा विचित्र अपघात घडला. सुदैवाने ही बस आगाराच्या बाहेर न निघाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.