Chandrakant Patil

Chandrakant Patil : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

635 0

जळगाव : मुक्ताई नगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गाडीचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये दोन पोलीस कर्मचारी आणि आमदार चंद्रकांत पाटील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सूरू आहेत.

काय घडले नेमके?
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये फिरत असताना आमदार चंद्रकांत पाटील यांच्याच ताफ्यातील दोन गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला.या अपघातामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह त्यांच्या सोबत असलेले दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात पोलीस व्हॅनसह आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!