BEED VIRAL VIDEO: महाराष्ट्राचा बिहार म्हणून ओळख वाढू लागलेल्या बीड जिल्ह्यातून रोज नवनवीन गुन्हे समोर येत आहेत. विशेष म्हणजे बीडमध्ये गुन्हा करून तो लपवला जात नाही तर व्हिडिओ काढून वर्चस्व वादासाठी ते व्हायरल सुद्धा केले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आलाय ज्यामध्ये एका तरुणाला मुंडे गॅंग कडून बेदम मारहाण होते. ही मारहाण इतकी जबर होती की पुन्हा एक नवीन संतोष देशमुख प्रकरण होता होता टळलं, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.BEED VIRAL VIDEO:

BEED VIRAL VIDEO: बीडमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला मुंडे गॅंगकडून बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

2262 0

BEED VIRAL VIDEO: महाराष्ट्राचा बिहार म्हणून ओळख वाढू लागलेल्या बीड जिल्ह्यातून रोज नवनवीन गुन्हे समोर येत आहेत. विशेष म्हणजे बीडमध्ये गुन्हा करून तो लपवला जात नाही तर व्हिडिओ काढून वर्चस्व वादासाठी ते व्हायरल सुद्धा केले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आलाय ज्यामध्ये एका तरुणाला मुंडे गॅंग कडून बेदम मारहाण होते. ही मारहाण इतकी जबर होती की पुन्हा एक नवीन संतोष देशमुख प्रकरण होता होता टळलं, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.BEED VIRAL VIDEO:

बीडमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला मुंडे गॅंगकडून बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

शिवराज हनुमान दिवटे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो परळीतील रहिवासी आहे. परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून तो जात असताना शुक्रवारी सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान मुंडे गॅंगनं त्याचं अपहरण केलं. यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आलं. याठिकाणी समाधान मुंडे आणि त्याच्या टोळीतील इतर गुंडांनी शिवराजला लाठ्या, काठ्या, पट्ट्यांनी बेदम मारहाण केली. शिवराज जीवाच्या आकांताने ओरडत होता मात्र दहा-बारा जणांच्या टोळक्या कडून त्याला मारहाण केली जात होती. अक्षरशः लाठ्याकाठ्या तुटेपर्यंत या गुंडांनी शिवराज ला जबर मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सुद्धा या गावगुंडांनीच काढला. मात्र जवळच असलेल्या रत्नेश्वर मंदिरात लग्न सोहळा सुरू होता त्यामुळे हळूहळू वर्दळ वाढली. आणि शिवराजच्या ओरडण्याचा आवाज अनेकांना ऐकू आला. त्यामुळेच नेमकं काय सुरू आहे हे पाहण्यासाठी काही लोक तिथे जमले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. याचा मारहाणीचा व्हिडिओ काल रात्री तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पुन्हा बीडचा बिहार झालाय अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या.

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतरही बीड मधील गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत. बीडमध्ये कोणत्याच गुन्हेगारांना पाठीशी घातला जाणार नाही, गुन्हेगारी थांबलीच पाहिजे असा इशारा त्यांनी या आधीच दिला होता. नवीन आलेले एस पी नवनीत कॉवत यांनी देखील अनेकदा धडक कारवाई करत गुन्हेगारीला लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र असं असूनही गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. विशेष म्हणजे प्रत्येक वेळेस या सगळ्यात अनेक अल्पवयीन तरुण असतात. या व्हिडिओत देखील अगदी लहान वयाचेच मुलं मारहाण करताना दिसत आहेत. त्यामुळे या प्रकरणात बीड पोलीस काय कारवाई करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय.

ISIS TERRORIST ARREST: पुण्यातील कोंढवा, वानवडीतील दहशतवाद्यांना इंडोनेशियामधून अटक; दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळला ?

CHHAGAN BHUJBAL : माजी मंत्री छगन भुजबळ यांना मागितली 1 कोटीची खंडणी; नेमकं प्रकरण काय?

Share This News
error: Content is protected !!