Sanket Bhosle Murder Case : संकेत भोसले हत्या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला अटक

1564 0

ठाणे : संकेत भोसले हत्या प्रकरणी (Sanket Bhosle Murder Case) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भिवंडी शहर शिवसेना उपप्रमुख (शिंदे गट) कैलास धोत्रे याला अटक करण्यात आली आहे. भिवंडी शहर पोलिसांनी धोत्रे याच्यासह दोन आरोपींना या प्रकरणी अटक केली आहे. आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे नेमके संकेत भोसले हत्या प्रकरण?
14 फेब्रुवारी रोजी शहरातील बीएनएन कॉलेजजवळ धक्काबुक्कीवरून देवा धोत्रे आणि संकेत यांच्यात वाद झाला होता. यानंतर हाणामारीही झाली. काही वेळानंतर देवा, त्याचे वडील कैलास आणि त्याच्या इतर साथीदारांनी संकेतचे अपहरण केले. मारहाणीनंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत फेकण्यात आले. गंभीर जखमी संकेतवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा मुख्य आरोपी धोत्रे, आकाश जाधव आणि विशाल साबळे यांना अटक केली. त्याचवेळी भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ओम लोंढे याला अटक केली. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मयत संकेत भोसले याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली. सध्या या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manohar Joshi : सुसंस्कृत नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला; मुख्यमंत्री शिंदेंनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली

Lasya Nandita : धक्कादायक ! भीषण अपघातात ‘या’ तरुण महिला आमदाराचा मृत्यू

Rajendra Patni : कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

Jitendra Awhad : आमच्या पक्षानं ‘तुतारी’ हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांचा धक्कादायक खुलासा

Solapur Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Share This News
error: Content is protected !!