SHISRISH VALSANGKAR CASE UPDATE: डॉ. शिरीष वळसंगकर (SHISRISH VALSANGKAR)आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट आलाय.
या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने यांनी वळसंगकर यांच्या कुटुंबियांच्या
बँक खात्याचे (BANK AUDIT) ऑडिट करण्याची मागणी केलीये.
SHISRISH WALSANGKAR CASE : डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात नवा ट्वीस्ट; बँक अकाउंट ऑडिटची मागणी
या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने सध्या जामीनावर बाहेर आहे.
‘मी रुग्णालयात आर्थिक अपहर केलेला नाही. यातील सत्यता बाहेर येण्यासाठी डॉक्टर शिरीष यांची पत्नी
डॉ. उमा मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. सोनाली आणि वळसंकर हॉस्पिटलच्या बँक खात्यांचे ऑडिट व्हावं
अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचे ठोस उत्तर अजूनही समोर आलेलं नाही.
या गुन्ह्यात सदर बाजार पोलिसांनी 720 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलय. त्यानंतर मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी जामीनावर युक्तिवाद केला आणि
तो ग्राह्य म्हणून जिल्हा सत्र न्यायालयाने मनीषाला जामीन मंजूर केला.
त्यानंतर डॉक्टर उमा वळसंगकर यांनी मनीषा वर आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल करण्याचे पत्र पोलिसांना दिलं.
त्यानंतर मनीषा यांनी वकिलामार्फत अर्ज देत त्या मुद्द्याचा तपास अधिकाऱ्यांनी यापूर्वीच केला असून दोषारोप पत्रात त्या संदर्भात साडेतीनशे पान आहेत
. या मुद्द्यांच्या चौकशीसाठी तपास अधिकाऱ्यांनी पोलीस कोठडी घेतली होती याची आठवण करून दिली त्यानंतर आता
आपण कोणताही अपहार केला नसल्याचे सांगत मनीषा यांनी आर्थिक बाबींची वस्तुस्थिती बाहेर येण्यासाठी रुग्णालयासह
वळसंगकर कुटुंबीयांच्या बँक खात्यांचं ऑडिट करावं अशी मागणी केली आहे.
माझ्या बँक खात्याची किंवा आर्थिक व्यवहाराची सखोल तपासणी केली मात्र माझ्या खात्यात आलेली रक्कम कोठून आली?
याची पडताळणी करताना वळसंकर हॉस्पिटलची बँक खाते, डॉ. शिरीष डॉ. अश्विन, डॉ. उमा डॉक्टर सोनाली यांच्या बँक खात्यांची कोणतीही चौकशी झालेली नाही.
वस्तुस्थिती समोर येण्यासाठी हॉस्पिटलच्या हिशोबासाठी वापरले जाणारे ‘लाईफ लाईन मनोरमा’ हे सॉफ्टवेअर शिवाय दैनंदिन आयपीडी पैसे देखील लेखापरीक्षण व्हावे जेणेकरून मी आर्थिक अपहार केला नाही
. हे स्पष्ट होईल असे त्यांनी अर्जात नमूद केल्याचं ही पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
आता मनीषा यांच्या अर्जाचा विचार केला जातो का? किंवा या प्रकरणात आणखी नवी कोणती माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.