शिरूर तालुका SHIRUR NEWS: तिहेरी हत्याकांडाने हादरलाय. हातावर जय भीम असा टॅटू असलेल्या एका महिलेचा मृतदेह सह दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेले मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

SHIRUR NEWS: ‘जय भीम’चा टॅटू, अर्धवट जळालेले तीन मृतदेह; शिरूरमध्ये घडलं रहस्यमयी तिहेरी हत्याकांड

438 0

शिरूर तालुका SHIRUR NEWS: तिहेरी हत्याकांडाने हादरलाय. हातावर जय भीम असा टॅटू असलेल्या एका महिलेचा मृतदेह सह दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेले मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हत्याकांडाचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

पुणे-अहिल्यानगर मार्गावर SHIRUR NEWS:  खंडाळे माथा परिसरातील एका कंपनीच्या मागील बाजूने जाणाऱ्या एका पादचाऱ्याला या संपूर्ण परिसरात मोठी दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं. या व्यक्तीने खंडाळे येथील पोलीस पाटील असलेल्या सीमा खेडकर यांना त्वरित याविषयी माहिती दिली. खेडकर यांनी काही ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी त्यांना अर्धवट जळालेला एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

RANJANGAON MIDC SHIRUR CASE: रांजणगाव एमआयडीसीत तिहेरी हत्याकांड, पोलिसांकडून तपास सुरू

अमृता देहाच्या शेजारीच अडीच ते साडेसहा वर्षा दरम्यान वय असलेल्या दोन लहान मुलांचे मृतदेह देखील आढळले. याबाबत त्यांनी तातडीने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. हे तीनही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. तर घटनास्थळाचा पंचनामा देखील करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार या महिलेच्या हातावर जय भीम असा टॅटू काढलेला आहे. महिलेच्या डोक्यात मारहाण केलेले घाव दिसल्याने हल्लेखोरांनी पहिल्यांदा या महिलेला जबर मारहाण करून तिचा खून केला असावा त्यानंतर तिच्याबरोबर असलेल्या या लहान मुलांना देखील संपवून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही महिला रांजणगाव एमआयडीसी परिसरात नोकरी किंवा वास्तव्याला असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून रांजणगाव पोलिसांनी आपला तपासही सुरू केलाय. या तिहेरी हत्याकांडाचा लवकरात लवकर तपास लावण्याची मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या राहुल डंबाळे यांनी केली आहे.

SHIRUR NEWS: ‘जय भीम’चा टॅटू, अर्धवट जळालेले तीन मृतदेह; शिरूरमध्ये घडलं रहस्यमयी तिहेरी हत्याकांड

या तिहेरी हत्याकांडाची बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर घटनास्थळी अनेक ग्रामस्थांनी गर्दी केली होती. महिलेच्या मृतदेहाबरोबर असलेल्या दोन चिमुकल्यांचे मृतदेह पाहून ग्रामस्थ ही गहिवरले. या महिलेबरोबर आणि लहान मुलांबरोबर नेमकं काय घडलं असेल ? याचे अनेक तर्कवितर्क लावून विविध अँगल्सनं याचा तपास सुरू आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवण्यात अडथळे येत आहेत. मात्र सीसीटीव्ही फुटेज, बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती, अशा अनेक तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नवनियुक्त पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यामुळे या तिहेरी हत्याकांडाचा उलघडा लवकरात लवकर करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

NIRA RIVER: नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Share This News
error: Content is protected !!