Shirdi News

Shirdi News : पवारांच्या कार्यक्रमावरुन परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला

804 0

शिर्डी : शिर्डीमधून (Shirdi News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत असताना त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. दहा ते बारा जणांनी हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावामध्ये हा प्राणघातक हल्ला झाला.

काय घडले नेमके?
काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले हे काल सायंकाळी कार्यक्रमावरून घरी परतत असताना दहा ते बारा जणांनी अचानक गाडी समोर येत त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला. राहता तालुक्यातील लोणी गावात संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून या हल्ल्यात सचिन चौगुले व त्यांच्याबरोबर असलेले सुरेश आरणे हे दोघे जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दोघांनाही संगमनेर तालुक्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली. आजची घटना ही दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. तसेच पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Catalyst Foundation : कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत कोरेगाव भीमा येथे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम

Pune News : चायनीज मांजा जाळत पुण्यात मनसेनी केले तीव्र आंदोलन

Truck Drivers Strike : पेट्रोल-डिझेल टँकर चालकांचा संप अखेर मागे; पोलीस बंदोबस्तात टँकर होणार रवाना

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे बनला मुंबईचा कर्णधार! ‘या’ खेळाडूला संघातून वगळले

Pandharpur News : मुलाच्या हळदीत नाचताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू; मृत्यूचे कारण ऐकून बसेल धक्का

Weather Update : राज्यात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Ajit Pawar : लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Pune News : पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त

Chhatrapati Sambhajinagar : छ. संभाजीनगरातील 6 कामगारांचा जळून मृत्यू झालेल्या कंपनीबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Truck Driver Strike : आंदोलनाचा इंधन पुरवठ्याला मोठा फटका

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!